Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोलिसांनी पकडला सुमारे एक कोटींचा गुटखा ; असा लागला सुगावा…

Webdunia
गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (08:34 IST)
अहमदनगर कोतवाली पोलिसांनी नगर शहरातील कायनेटीक चौकात दुचाकीवरून गुटखा वाहतुक करणार्‍या दोघांना पकडल्यानंतर तोफखाना पोलिसांच्या हद्दीतील बोल्हेगाव येथील गुटखा गोडाऊनविषयी माहिती मिळाली होती.त्या गोडाऊनवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला असता तीन ट्रक गुटखा पोलिसांनी पकडला. बोल्हेगाव परिसरात बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत गुटख्याची मोजदाद सुरू होती.येवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान गोवा, माणिकचंद, हिरा, सितार अशा विविध कंपनीचा हा गुटखा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दोन तरूण दुचाकीवर गुटखा विक्री करण्यासाठी नगर-पुणे रोडवरून जात असल्याची खबर कोतवाली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कायनेटीक चौकात सापळा लावला.
 
तेथे पाठलाग करून दोन तरूणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे पिशवीमध्ये गोवा गुटखा मिळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता बोल्हेगावातील गुटखा गोडाऊनची माहिती मिळाली.
पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी या गोडाऊनवर छापा टाकला. तेथे विविध कंपन्यांचा गुटखा साठा पोलिसांना मिळून आला.सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ट्रकमध्ये भरण्यात आला. तीन ट्रक भरून हा गुटखा होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

भारतीय हवाई दलाचा 'एअर शो मध्ये आकाशात दिसले रॅफेल आणि सुखोई

लातूरच्या शासकीय वसतिगृहाच्या अन्नातून 50 विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात दाखल

ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी महंत यती नरसिंहानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला

मंगळुरूमधील कोल्लूर पुलाजवळ व्यावसायिकाची कार सापडली, पोलिसांचा शोध सुरु

डासना मंदिरात सुरक्षा वाढवली, कैला भट्ट चौकात पोलीस तैनात

पुढील लेख
Show comments