Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भिवंडीत २१ लाखांचा गुटखा जप्त, एकाला पोलिसांनी केले गजाआड..

Webdunia
मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (22:09 IST)
भिवंडी तालुक्यात २१ लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात टेम्पो चालक महादेव हनुमंत भोसले याला अटक केली आहे. महादेव हनुमंत भोसले यांना ५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
 
भिवंडी तालुक्यात पिंपळास येथील आर.के.जी गोडाऊन येथुन घेवून जाण्यासाठी एक आयसर टेम्पो येणार असल्याची खात्रीशीर माहिती कोनगाव पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवताच अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव व सहकाऱ्यांनी कोनगावचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणपतराव पिंगळे यांच्या सह गोडाऊनवर धाड टाकुण टेम्पोतील २१ लाख ८५ हजार ९२० रुपये किंमतीचा विना लेबल प्लॅस्टीकची एकुण ४७ मोठी पोती, त्यामध्ये केसरयुक्त प्रिमीयम क्वॉलिटीचे एकुण १५,१८० प्रतिबंधीत गुटख्याचे पॅकेट व ८ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण २९ लाख ८५ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून टेम्पो चालक महादेव हनुमंत भोसले वय ४२ यास अटक केली. दरम्यान मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पराग भाट हे करीत आहेत.
 

संबंधित माहिती

चंदू चॅम्पियन: भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण विजेते मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट

G-7 गट म्हणजे काय? हा गट युक्रेन आणि गाझामधील युद्ध थांबवू शकतो का?

रक्तदान कोण करू शकतं आणि कोण नाही? रक्तदानाबद्दलचे 7 महत्त्वाचे समज-गैरसमज

अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात न्यायालयात जावे-वर्षा गायकवाड

उद्धव ठाकरे यांना मराठी भाषिकांची मते मिळाली नाही -देवेंद्र फडणवीस

पुस्तकी तुला करताना पडले प्रतापराव जाधव, सुदैवाने दुखापत नाही

कुवेत: 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतात परतले हवाई दलाचे विमान

मोबाइल नंबरसाठी मोजावे लागणार पैसे

सुपर-8 मध्ये भारताचा सामना 24 जून रोजी ऑस्ट्रेलियाशी,पाहा वेळापत्रक

सीएम योगी म्हणाले- बकरीईद दिवशी रस्त्यावर होणार नाही नमाज, अधिकारींना दिले निर्देश

पुढील लेख
Show comments