Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रेकर्स तुमचा आवडता हरिहर गड पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी बंद

ट्रेकर्स तुमचा आवडता हरिहर गड पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी बंद
, बुधवार, 10 जुलै 2019 (09:27 IST)
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गड पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक वन अधिकारी कैलास अहिरे यांनी दिली. शहराबरोबरच ग्रामीण व खास करून मुंबई येथील ट्रेकर्स पर्यटकांचे वर्षा सहलीचे हे आवडते ठिकाण आहे. इथे कायमच गिर्यारोहकांचीही गर्दी असते. मात्र काही हुल्लडबाजी करणारया पर्यटकांमुळे इतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यातही पावसाळयात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जिल्हाधिकारयांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानूसार दिलेल्या निर्देशाचा आधार घेत हरिहर गड पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या रविवारी गडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली असती. मात्र सुदैवाने असे काही घडले नाही. या किल्ल्याच्या पायऱ्या अत्यंत अरुंद असुन एका वेळेस एकच माणूस चढू किंवा उतरू शकतो. याची दखल घेत यासाठी पावसाळ्यात हरिहर गडावर जाण्यास आपत्ती व्यवस्थापन उपाय योजना अंतर्गत प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झोमॅटो इंडियाच्या ट्विटने केला ट्रेन्ड तयार