Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेप्रकरणी सासऱ्यासह जावयाला ठोकल्या बेड्या

Webdunia
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (22:03 IST)
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात  पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगून सुरक्षायंत्रणासह भाविकांमध्ये खळबळ उडवणाऱ्या दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथक (ATS) व एलसीबीने बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक केली आहे. अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरताच (Spreading rumors of bomb) परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
जावई सुरेश लोंढे आणि सासरा बाळासाहेब कुरणे (दोघे रा. वडगाव, ता. हातकणंगले) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. गुरुवार पासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी साडेचारच्या सुमारास या दोघांनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची माहिती पणजी गोवा येथील पोलीस मुख्यालयात  दिली.
 
बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच गोवा पोलिसांनी तात्काळ याची माहिती कोल्हापूर नियंत्रण कक्षाशी सपर्क साधून दिली. बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे (SP Shailesh Balkwade), अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे (Additional Superintendent of Police Tirupati Kakade) यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौज फाटा अंबाबाई मंदिरात दाखल झाला. पोलिसांनी भाविकांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना देऊन तातडीने बोम्ब शोधण्याची मोहीम राबवली. मात्र मंदिरात आणि परिसरात कोणतीच संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याने ही अफवा असल्याचे अधीक्षकांनी सांगितले.
 
दरम्यान, उत्सव काळात पोलिस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन यंत्रणेची तारांबळ उडवणाऱ्या संशयितांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले.त्यानुसार पोलिसांनी मोबाईल लोकेशन द्वारे दोघांना ताब्यात घेतले.आरोपींचा शोध घेण्यासाठी चार पथके सांगली जिल्ह्यात रवाना केली होती.

आज (शुक्रवार) सकाळी दोघांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव (Police Inspector Pramod Jadhav)आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे (juna rajwada police station) पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे (Police Inspector Dattatraya Nale) यांनी सांगितले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments