Dharma Sangrah

'त्या' राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून अटक करणार

Webdunia
गुरूवार, 4 मार्च 2021 (17:54 IST)
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा संबंध एका तृतीपंथीय व्यक्तीशी असल्याची पोस्ट एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने शेअर केली होती. या पोस्टचा उल्लेख अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधासभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पटोले यांनी केला. यावेळीस भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सभागृहात आवाज उठवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करून तात्काळ त्याला जेरबंद करण्याची मागणी केली. यालाच प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून अटक केली जाईल असं सांगितलं.
 
देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले की, राष्ट्रवादीच्या चिंचवडच्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट लिहिली. जर आमच्या पक्षाच्या लोकांनी सरकारविरोधात काही बोललं तरी देखील जेलमध्ये टाकलं जात. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता अशाप्रकारे पोस्ट लिहितो आणि त्याच्या साधी कारवाई केली जात नाही.  अशाप्रकारणे इथे बसलेल्या सगळ्यांविरोधात लिहिणे हे योग्य नाही आहे. जर खरंच सरकारमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर एफआयआर दाखल करावी आणि त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे.
 
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असो किंवा इतर पक्षाचा कार्यकर्ता असो, त्याने जर चुक केली आहे, तर आजच्या आज त्याच्यावर कारवाई करून अटक केली जाईल.’

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

शरद पवार गटाला मोठा धक्का: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये सामील होणार; मोठे संकेत मिळाले

SRH vs RR : वैभवच्या स्फोटक खेळीने हैदराबादचा धुव्वा उडवला, राजस्थाने बनवले २४३ रन

SRH vs RR : राजस्थानने हैदराबादला ४७ धावांनी हरवून आयपीएलमधून बाहेर काढले

सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीतही पार्थ पवार मोठे निर्णय घेत आहे, ज्येष्ठ नेते संतप्त झाले

भोंदू बाबा अशोक खरातच्या कथित कृत्यांवर आधारित मराठी चित्रपट बनणार; अभिनेत्री दीपाली सय्यद प्रमुख भूमिका साकारणार

पुढील लेख
Show comments