Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली
, मंगळवार, 20 एप्रिल 2021 (08:02 IST)
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी मुंबईतील जे जे रूग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यावेळी त्यांनी ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. याचबरोबर मी लस घेतली आपणही घ्या! असं टोपे म्हणाले आहेत.
 
कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून आतापर्यंत सुमारे १ कोटी २२१ लाख लाभार्थ्यांना लस देऊन महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे, १८ ते ४४ वर्षापर्यंतच्या नागरिकांचेही लसीकरण सुरू करावे, या मागणीचा पुनरुच्चार देखील यावेळी आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केला होता.
 
फेब्रुवारीमध्ये आरोग्यमंत्री टोपे यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र करोनावर मात करून ते पुन्हा कर्तव्यावर रुजूही झाले मात्र लगेच त्यांना लस घेता येणे शक्य नसल्याने त्यांनी आता दोन महिन्यानंतर लस घेतली. यावेळी त्यांनी लस देणाऱ्या परिचारिका, जे जे रूग्णालयाचे डॉक्टर यांचे आभार मानले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

किंचित दिलासा, राज्यात 58,924 नवे कोरोना रुग्ण