राज्यात उष्णतेनं नागरिक हैराण होत असून उन्हाचे चटके आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणि येत्या काही दिवसात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. त्याचा परिणाम म्हणून उष्णतेत वाढ होणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याच्या परिणाम अनेक राज्यांमध्ये दिसून येणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उष्णतेचे सर्वाधिक चटके गुजरात, राजस्थान, ओडीसा महाराष्ट्राला बसणार आहेत. या राज्यांमध्ये अतितापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे.
राज्यात वाढत्या तापमानाची झळ ही सर्वाधिक विदर्भ, खानदेशाला बसणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेने 40 अंशाचा पारा ओलांडला आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.