नवसाला पावणारा म्हणुन ख्याती असणाऱ्या लालबाग राजाच्या दर्शनाला मंगळवारच्या पावसामुळे कुणीही नव्हते, यामुळे इतिहासात प्रथमच लालबाग राजाचा मंडप रिमाका दिसून आला.
मंगळवारी पडलेल्या पावसाने मुंबईकराचे प्रचंड हाल झाले. त्यातच लोकल सेवा ठप्प झाली होती. रस्त्यांवर कमरेपर्यंत पाणी साचल्यामुळे वाहनेही बंद पडत होती. यामुळे अनेकांनी मिळेल त्या वाहनाने. तर पायी चालत घर गाठले होते. रस्त्यांवर कमरेपर्यंत पाणी साचल्याने त्या पाण्यातुन वाट काढत मुंबईकर जात होते.
लालबाग राजाच्या दर्शनाला मुंबईसह परराज्यातील आणि विदेशातील नागरिक दर्शनाला येतात. परंतु मंगळवारी पडलेल्या पावसामुळे याठिकाणी कुणीच फिरकले नाही. यामुळे मंडपामध्ये फक्त बप्पाची मुर्ती दिसत होती.