नोव्हेंबर संपत आले तरीही राज्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरूच आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली . मच्छीमारानीं समुद्राच्या दिशेने जाऊ नये असे सांगण्यात आले आहे. राज्यात सध्या पडणाऱ्या अवकाळी पावसाने पिके खराब केली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. वाढणाऱ्या महागाईमुळे आणि पीक खराब झाल्यामुळे आता जगायचे कसे हा मोठा प्रश्न शेतकरी समोर उदभवत आहे
हवामान खात्यानं राज्यातील पुणे ,कोल्हापूर, नाशिक , सांगली, सातारा, सोलापूर , रायगड, अहमदनगर, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे