Marathi Biodata Maker

महामार्गांलगतच्या दारु दुकानांचा मार्ग मोकळा

Webdunia
गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (17:06 IST)

महामार्गांच्या पाचशे मीटर अंतरातील दारुची दुकानं जर महापालिकेच्या अखत्यारित येत असतील तर यापुढे त्यांच्यावर दारुबंदी नसेल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील महामार्गांलगतची परवानाधारक दुकानं पुन्हा सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामधील मृत्यू यांचे प्रमाण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने 15 डिसेंबर 2016 रोजी केंद्र आणि राज्य सरकारांना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या 500 मीटर परिसरातील दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयात सुधारणा करुन सुप्रीम कोर्टाने हा नवा निर्णय दिला आहे.

दारुबंदीतून सुटण्यासाठी राज्य सरकारनं तात्काळ काही रस्ते स्थानिक प्रशासनाला हस्तांतरित केले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने ही बाब स्पष्ट करुन सांगितली आहे.  राज्यातील सुमारे 25 हजार दारु विक्रीच्या परवान्यांपैकी 15 हजार परवाने रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आली, तर राज्याचा 7 हजार कोटींचा महसूलही बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेशात हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला, नंतर पेट्रोल ओतून जाळून टाकले

हे काय ! शिवसेनेच्या उमेदवाराने स्वतःच्याच नेत्याचा एबी फॉर्म फाडून गिळला

चालत्या व्हॅनमध्ये क्रूरता, नंतर पीडितेला रस्त्यावर फेकून दिले; या प्रकरणाने देशाला हादरवून टाकले

आदित्य ठाकरेंच्या कोअर टीमला मोठा धक्का: शीतल देवरुखकर-शेठ उद्धव ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये सामील

बीएमसी निवडणुकीत मतविभाजनाची भीती संपली ? ३२ जागांवर 'तिसरी आघाडी' नसेल, दोन आघाड्या आमनेसामने येतील

पुढील लेख
Show comments