Marathi Biodata Maker

राज्यातील शाळांना सुट्टी, पुढील शैक्षणिक वर्ष 14 जूनला सुरु होणार

Webdunia
शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (22:56 IST)
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून, १ मे ते १३ जून असा हा सुट्टीचा कालावधी असणार आहे. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन शाळेतून सुट्टी मिळाली आहे. तसेच, नवीन शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमान लक्षात घेता २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. राज्यातील शिक्षक संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी केली जात होती. अखेर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
 
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता रहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्याबाबत खालील सूचना आपण जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना द्याव्यात, असे शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी कळवले आहे.
 
यानुसार १ मे २०२१ ते १३ जून २०२१ पर्यंत उन्हाळी सुट्टीचा कालावधी असणार आहे. तसेच, पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात आणि विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार २८ जून २०२१ रोजी शाळा सुरू होतील, असे सांगण्यात आलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: भाजप नेते आशिष शेलार यांनी महापालिका निवडणुकीबाबत मोठे विधान केले

कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला

मनोरुग्णालयात मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर अनेक जखमी; नागपूर मधील घटना

आशिष शेलार म्हणाले महापालिका निवडणुका म्हणजे युती नाही; भाजपने स्वतःला अजित पवारांच्या नेत्यांपासून दूर केले

"महायुतीमध्ये टोळीयुद्ध सुरू आहे"-महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

पुढील लेख
Show comments