Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भयंकर , तुटपुंज्या रक्कमेसाठी चिमुरड्यांची विक्री, टोळी पकडली

arrest
, गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (21:12 IST)
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील एका अल्पवयीन चिमुरडीच्या संशयित मृत्यूने खळबळ उडाली होती. याप्रकरणी तपास केला असता काही तुटपुंज्या रक्कमेसाठी मेंढपाळ लहान मुलांना संगमनेर परिसरात घेऊन जातात आणि त्यांचा शारीरिक छळ करत त्यामुलांकडून मेंढ्या चारण्याचे काम करून घेत होते. नाशकातील ६ ते ७ मुले गायब झाले असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेत चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान चिमुरडीच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे या प्रकरणांमध्ये घोटी अकोले घुलेवाडी या तीन पोलीस स्टेशनमध्ये वेठबिगारी बालमजुरी आणि ॲट्रॉसिटी कायदा खाली चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील मुख्य आरोपी कांतीलाल करांडे हा फरार असून विकास कुदनर याला नगर जिल्ह्यातील अकोले पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील सहा मुलं सापडली असून 24 मुलं अद्याप बेपत्ता आहेत.
 
वेठबिगार मुद्दा कसा आला उघडकीस ?
 
उभाडे येथील कातकरी वस्तीमधील तुळसाबई सुरेश आगीवले यांनी तीन वर्षांपूर्वी आपली मुलगी गौरी (वय १०) हिला घरची परिस्थिती जेमतेम असल्याने संशयित आरोपी विकास सीताराम कुदनार रा. शिंदोडी (ता. संगमनेर) याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात पाठवले होते. संशयिताने काही दिवस चिमुरडीला चांगले सांभाळत असल्याचे भासवले. दि. २७ ऑगस्टच्या मध्यरात्री गौरी हिस उभाडे येथील आगीवले कुटुंबीयांच्या झोपडी वजा राहत्या घराजवळ विकास कुदनार व त्याच्या साथीदारांनी तिला टाकून पलायन केले. आपल्या घराजवळ कोण आहे हे पाहण्यासाठी तुळसाबाई गेल्या असता त्यांना धक्का बसला. लाल चादरीत गुंडाळून बेशुद्ध अवस्थेत असलेली मुलगी गौरी असल्याचे समजताच हंबरडा फोडला.  गौरी हिची तब्येत गंभीर असल्याने तिला रूग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सात दिवसांच्या उपचारादरम्यान गौरी हिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
पोलिसांनी केला घटनेचा सखोल तपास
गौरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील आणखी 6 ते ७ मुले गायब असल्याचे चित्र स्पष्ट झाले. गेल्या तीन वर्षापासून नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील मुलांना आई वडील वर्षाचे तुटपुंजी रक्कम ५ ते १० हजार रुपये घेऊन हे काम करण्यासाठी पाठवत आहेत. या तिन्ही जिल्ह्यातील जवळपास 30 लहान मुलांना या कामासाठी एका एजेंट मध्यामतून विक्री करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. नाशिक आणि नगर पोलीस या संदर्भात चौकशी करत आहेत आणि यात काही जणांना ताब्यात देखील घेतले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश