Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉक्टर, नर्सेस, आरोग्य यंत्रणा कोरोनाविरुद्ध लढत असताना नाशिक व विरारसारख्या रुग्णालय दुर्घटना घडणं क्लेशदायक – उपमुख्यमंत्री अजित पवार

डॉक्टर  नर्सेस  आरोग्य यंत्रणा कोरोनाविरुद्ध लढत असताना नाशिक व विरारसारख्या रुग्णालय दुर्घटना घडणं क्लेशदायक – उपमुख्यमंत्री अजित पवार
Webdunia
शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (16:57 IST)
राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत आहेत. अशावेळी नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहिली. मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल त्यांनी सहसंवेदनाही व्यक्त केल्या.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांची सुरक्षितता, फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रुटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्याने घेतली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

खासदार अरुण गोविल यांनी सौरभ हत्येतील आरोपी मुस्कान आणि साहिल यांची भेट घेत दिले रामायण

प्रसिद्ध युट्यूबर मृदुल तिवारीच्या लॅम्बोर्गिनीने कामगारांना चिरडले

ठाणे: प्रेयसीशी झालेल्या भांडणानंतर १८ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

LIVE:प्रशांत कोरटकर यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

मुंबईत बजरंग दलावर एफआयआर दाखल

पुढील लेख
Show comments