Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार गेल्यानंतर या पार्ट्या कशा काय बंद झाल्या?, नवाब मलिक यांचा सवाल

How did these parties close after the government left ?
Webdunia
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (08:55 IST)
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात जर मी एका हॉटेलमध्ये झालेल्या भेटीचे फुटेज बाहेर काढले असते तर भाजपचे नेते तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नसते, असा प्रखर हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवला.
 
फोर सिझन हॉटेलमध्ये महागड्या पार्ट्यांचे आयोजन केले जात होते. एका टेबलचे बुकिंग १५ लाखांपर्यंत असायचे. या महागड्या पार्ट्यांचा आयोजक कोण होता? याची माहिती तुम्हाला नव्हती का? आपले सरकार गेल्यानंतर या पार्ट्या कशा काय बंद झाल्या? तुम्ही या पार्ट्या का रोखल्या नाहीत? असे सवाल करत मलिक यांनी फडणवीस यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण केले.
 
देवेंद्र फडणवीस यांनी काल, सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचे गुन्हेगारी विश्वाशी संबंध असल्याचा आरोप केला होता. याचे पुरावे आपण राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत फडणवीस यांचे आरोप खोडून काढले.
 
फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीपर्यंत थांबण्याची गरज नाही. माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असे सांगितले गेले. पण माझे कधीच अंडरवर्ल्डशी संबंध आले नाहीत. जर कुणाचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत हे माहीत असताना मग त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही का कारवाई केली नाही. ज्या दिवशी तुमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा मी तोतया फडणवीस मंत्रालयात फिरत असल्याची टीका केली होती. तेव्हा मी तुम्हाला त्या तोतयाबद्दल माहितीही दिली होती. तो कुणासोबत उठतो, बसतो त्याबद्दल सविस्तर माहिती दिली होती. जर राजकीय डूख धरायचा असता तर मी ही माहिती आपल्याला दिली नसती, असे मलिक म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

LIVE: पंतप्रधान मोदी ३० मार्च रोजी नागपूर शहरात पोहोचतील

मुख्यमंत्री योगींनी राहुल गांधींना "नमुना" म्हटले, संतप्त काँग्रेस नेते म्हणाले- यूपीवर लक्ष केंद्रित करा...

हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी नागपूर शहरात पोहोचतील

दिशा सालियन प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही, मंत्री शंभूराज देसाई यांचे मोठे विधान

ठाणे: वर्क फ्रॉम होम बहाण्याने महिलेची १५ लाख रुपयांना फसवणूक

पुढील लेख
Show comments