Dharma Sangrah

मुख्यमंत्र्यानी केलेल्या घोषणांची किती अंमलबजावणी झाली : आमदार विखे

Webdunia
शनिवार, 1 मे 2021 (15:55 IST)
राज्य सरकारने दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस मुख्यमंत्र्यानी केलेल्या घोषणांची किती अंमलबजावणी मंत्री आणि विभागाकडून झाली? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. आमदार विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात दुसऱ्या लॉकडाऊनवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांच्या मागील घोषणेनंतरही गरजूंना धान्य मिळालेले नाही.सामान्य माणसाची उपासमार सुरूच आहे. किमान झालेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
 
केंद्र सरकारचा लसीकरणात दुजाभाव हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा आरोप आश्चर्यकारक वाटतो. एकीकडे राज्यात सर्वाधिक लसीककरण झाले म्हणून सरकार पाठ थोपटून घेते.मग केंद्राच्या सहकार्याशिवाय हे लसीकरण झाले काॽ काय बोलतोय याचे भान मंत्र्यांनी ठेवायला हवे. एक मेपासून लसीकरणासाठी सर्वच राज्यांनी पुढाकार घेतला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र म्हणजे स्वतःची अब्रू झाकण्याचा प्रकार आहे. एक वर्षापासून कोविड संकट आहे.
 
सुविधांचा अभाव असल्याचे आज कळाले काॽ फक्त फार्स करायचा आणि स्वतःचे अपयश झाकण्यासाठीचा हा पत्रव्यवहार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

FIH पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जर्मनीने भारताचा पराभव केला

मुंबई विमानतळावर आज सकाळी इंडिगोची पाच उड्डाणे रद्द

संसदेत वंदे मातरम वर १० तासांची चर्चा होणार; पंतप्रधान मोदी लोकसभेत आणि अमित शाह राज्यसभेत करतील सुरवात

नागपुरातील गडकरी जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थित; अपंगांनी व्यक्त केली कृतज्ञता

Maharashtra Winter Session नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू; प्रत्येक मुद्द्यावर होणार चर्चा

पुढील लेख
Show comments