Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजून किती मुलं जाण्याची सरकार वाट बघतंय, स्वप्नीलच्या आईचा सवाल

children
Webdunia
बुधवार, 14 जुलै 2021 (22:18 IST)
महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पुण्यात स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी प्रविण दरेकरांशी बोलताना या कुटुंबानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी स्वप्नीलच्या आईला अश्रू अनावर झाले. “अजून किती मुलं जाण्याची सरकार वाट बघतंय”, असा जळजळीत सवाल स्वप्नीलच्या आई छाया लोणकर यांनी सरकारला विचारला आहे.
 
यावेळी छाया लोणकर यांनी सरकारी कारभार आणि नेतेमंडळींच्या भेटीगाठीवर देखील तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “१५ दिवस झाले. फक्त येऊन भेटून जातात. प्रत्येक जण आश्वासन देऊन जातात. सरकारनं ठाम सांगावं की आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही. दोन महिन्यांनी सरकार कुणाचं का असेना, सरकारला आमच्या तिघांच्या आत्महत्या पाहाव्या लागतील. आमच्या पोटचा गोळा गेला. आम्ही त्याला कसं शिकवलं आमचं आम्हाला माहिती. यांनी थोडे निर्णय आधीच घ्यायला हवे होते. दोन दोन वर्ष निर्णय लांबवले. करोना काळात दोन दोन महिने फक्त लॉकडाउन केलं होतं. बाकीचं सगळं चालूच होतं”, असं छाया लोणकर म्हणाल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी

सावित्रीबाई फुले स्मृतिदिन विनम्र अभिवादन

काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार आज महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार

बीड : भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सतीश भोसले यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मिळाली धमकी

पुढील लेख
Show comments