Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उध्दव यांच्या क्षमतेबद्दल मला शंका : राणे

उध्दव यांच्या क्षमतेबद्दल मला शंका : राणे
नागपूर , शनिवार, 21 डिसेंबर 2019 (15:07 IST)
मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विराचांशी बेईमानी केली, असा आरोप माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी केला. नव्या सरकारवर टीका करताना राणे यांनी ठाकरे यांचा एकदा एकेरी उल्लेख केला. तसेच त्यांच्या क्षमतेबद्दल मला शंका आहे, असेही ते म्हणाले.
 
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे पहिलेच अधिवेशन नागपुरात सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनाबद्दल सर्वसामन्यांबरोबरच नेत्यांनाही प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुसरच्या दिवशी नागपुरात दाखल झाले होते. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे तिथे पोहोचले होते. नारायण राणे हेही अधिवेशनस्थळी पोहोचले. 
 
तिथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले. महाराष्ट्राच्या जनतेने युतीला कौल दिला होता. पण महाविकास आघाडीसत्तेवर आली. ही आघाडी सर्व तत्त्व व विचारधारांना मूठमाती देऊन झालेली आहे. बाळासाहेब असते तर अशी आघाडी झाली नसती, असे राणे म्हणाले. आम्ही आघाडीत गेलो म्हणजे धर्मांतर केले नाही, या ठाकरे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. मी हिंदुत्ववादी आहे हे सोनिया गांधींना सांगा, असे राणे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा 'टॅक्स फ्री' पक्ष आहे. तो कुठेही जातो, असा टोला त्यांनी हाणला. 
 
महाराष्ट्रात धमक असणारा मुख्यमंत्री हवा. अन्यथा, महाराष्ट्र प्रगती करणार नाही. उध्दव, आदित्य व संजय राऊत हे पवारांकडे गेले आणि मुख्यमंत्रिपदासाठी उध्दव यांचे नाव जाहीर करणची गळ घातली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोनिया गांधी यांचे सरकारवर टीकास्त्र