Dharma Sangrah

मला असं वाटतं काही लोक शाहरुख खानवर जळतात : सुप्रिया सुळे

Webdunia
शनिवार, 28 जानेवारी 2023 (15:42 IST)
सध्या ‘पठाण’चं सर्वत्र कौतुक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे. ‘Unfiltered By Samdish’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी ‘पठाण’ चित्रपट तसेच शाहरुख व दीपिकाबाबत भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शाहरुख खान भारताचा सुपरस्टार आहे. तो त्या चित्रपटात (पठाण) अगदी चांगला दिसत आहे. तो व दीपिका एकत्र अगदी छान दिसत आहेत. मला असं वाटतं काही लोक शाहरुख खानवर जळतात.”
 
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रासारख्या राजकारण्यांनी ‘पठाण’ला केलेल्या विरोधाचं तुम्ही समर्थन करता का? असं सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. यावेळी त्या म्हणाल्या, “अजिबात नाही. मी या गोष्टींना पाठिंबा देत नाही. मी अशा वेळी त्या व्यक्तींना फोन करेन. त्यांना विचारेन की, भाऊ तुला काय झालं आहे?”
 
पुढे त्या म्हणाल्या, “आपण अशा विषयांवर चर्चा का करतो? अरुण जेटली म्हणायचे, तुम्ही दाखवणं बंद केलं तर लोक बोलणं बंद करतील. कधी कधी मला अरुणजी यांचं हे वाक्य पटतं.” शाहरुख व दीपिकाचा हा चित्रपट सुप्रिया सुळे यांच्याही पसंतीस पडला आहे. आता ‘पठाण’च्या कमाईमध्ये आणखीन किती वाढ होणार? हे पाहणं रंजक ठरेल.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

स्टार खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी बाहेर, आता रशीद खानला संघात समाविष्ट करण्यात आले

महाराष्ट्रातील शिक्षकांनी ५ डिसेंबर रोजी शाळा बंदची घोषणा केली

व्लादिमीर पुतिन भारतात आले, पंतप्रधान मोदींनी केले भव्य स्वागत

महाराष्ट्र सरकारने डिजिटल ७/१२ प्रमाणपत्रांना कायदेशीर मान्यता दिली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सालेकसा येथे ईव्हीएमचे सील तुटले; सपकाळ यांनी निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला

पुढील लेख
Show comments