राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान प्रवास नाकारला यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. यामध्ये भाजपाचा काय संबंध आहे. भाजपाला जर इतकं वाईट वाटत होतं तर त्यांचं विमान द्यायला हवं होतं. भाजपाकडे खूप व्यवसायिक विमानं आहेत. कोश्यारी भाजपाचे नेते आहेत. अलीकडे राजभवनात राज्यापेक्षा भाजपाची कामंच जास्त चालतात अशी लोकांची भावना आहे. राज्यपालांचा अपमान व्हावा अशाप्रकारचं कोणतंही काम राज्य सरकार किंवा राज्याचे मुख्यमंत्री करणार नाहीत आणि त्यानी केलंही नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
राज्यापालांना खासगी कामासाठी सरकारी यंत्रणा वापरायची असेल तर त्यासंदर्भात काही नियम आहेत. त्या नियमांचं सरकाने उल्लंघन केलं असतं तर आक्षेप आला असता. अनेक राज्यांमध्ये असे प्रकार घडले आहेत. तुम्ही जेव्हा वैयक्तिक कामासाठी आपल्या राज्यात जाता तेव्हा विमान वापरण्यासंदर्भात गृहखात्याचे काही निर्देश आहेत. त्या निर्देशांचं पालन राज्य सरकारने केलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.