Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच : फडणवीस

Webdunia
शनिवार, 18 डिसेंबर 2021 (21:31 IST)
बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कर्नाटकातील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनीही ट्वीट करुन या घटनेचा निषेध केलाय. ‘देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच’, असं फडणवीस म्हणाले.
 
‘आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत.त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच! ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईलच!’ असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments