Dharma Sangrah

देवळाली गावात शिंदे गट व ठाकरे गटात वादविवाद होऊन हवेत गोळीबार

Webdunia
शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (08:01 IST)
नाशिक :- शिवजयंती साजरी करण्यासाठी शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीत मोठा राडा झाला. यावेळी वादविवाद होऊन हवेत गोळीबार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, देवळाली गाव सार्वजनिक पार येथे आज सायंकाळी शिंदे गटाने शिवजयंती साजरी करण्यासाठी बैठक बोलावली होती.
 
ही बैठक सर्वपक्षीय समितीची असल्याचे निदर्शनास आले असता ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांनी त्यावर आक्षेप घेत शिंदे गटा बरोराबर आम्ही जयंती साजरी करणार नाही, त्यामुळे सर्वपक्षीय हा आशय काढून टाकावा अशी मागणी केली. त्या नंतर दोन्ही गटाच्या पदाधिकरी कार्यकर्ते यांच्या मध्ये वादविवाद व शिवीगाळ झाले. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्यानंतर शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने बंदुकीतून हवेत गोळीबार केला. गोळीबार होताच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धावपळ होऊन तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने देवळाली गावातील दुकाने पटापट बंद झाली.
 
ही माहिती पोलिसांना समजताच नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेले पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सिद्धेवर धुमाळ, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. कानोकानी गोळीबार घटनेची माहिती मिळाल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी घटानास्थळी पोहोचून गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कमी होत नसल्याने पोलीसांनी सोम्य लाठीचार्ज केला.
 
पोलिसांनी शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. उपनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. रात्री उशिरा उपनगर पोलिस ठाण्यात दोन्ही गटाची बैठक बोलावण्यात आल्याचे समजते.
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

अण्णा हजारेंचा संघर्ष यशस्वी, राज्यात नवीन लोकायुक्त कायदा लागू होणार

LIVE: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

U19 Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल जाणून घ्या

बारामती न्यायालयाने अजित पवारांना मोठा दिलासा दिला, निवडणुकीशी संबंधित प्रक्रिया आदेश रद्द केला

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा भंग करण्याचा प्रयत्न, कामगाराला अटक

पुढील लेख
Show comments