Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवघ्या काही दिवसांतच प्लांट उभा राहीला, वीज केंद्रातील ओझोन प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा शक्य

Webdunia
बुधवार, 28 एप्रिल 2021 (07:11 IST)
राज्यात दररोज कोरोना मृत्यू संख्येचा आकडा वाढत आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व खासगी व शासकीय  हॉस्पिटल, तसेच कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या उपलब्धतेची वाढती मागणी लक्षात घेऊन महानिर्मितीच्या वीज केंद्रातील ओझोन प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा करता येणे शक्य आहे का याची शक्यता तपासण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सूचित केले होते. त्यानंतर महानिर्मितीने तत्परतेने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे  व पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तंत्रज्ञांनी अवघ्या काही दिवसांतच प्लांट उभा केला त्याबद्दल त्यांचे कौतुक व्यक्त करण्यात आले.
 
परळी-बीड सारख्या भौगोलिक दृष्ट्या तुलनेने दुर्लक्षित भागात औषधे व ऑक्सिजन यासारख्या वैद्यकीय  सामुग्रीचा तुटवडा असताना बीड जिल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सध्याच्या परिस्थितीत परिसरातील गोरगरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना या ऑक्सिजन प्लांटमुळे जणू प्राणवायू मिळाला आहे या शब्दात ऊर्जा विभागाचे विशेष आभार मानताना त्यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थाकीय संचालक संजय खंदारे व त्यांच्या चमुचे कौतुक केले. तसेच याच तत्परतेने आणखी थोडे प्रयत्न करून नवीन परळी वीज केंद्रातून कॉम्प्रेसर्स व रिफिलिंग प्रणालीच्या माध्यमातून अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा सदर रुग्णालयातील नव्या नियोजित कोविड सेंटरला करावा अशीही सूचना केली. तसेच सध्या या नव्या ऑक्सिजन प्लांटमधून सुमारे ९५.२ इतक्या शुद्धतेचा ऑक्सिजन पुरवला जात असला तरीही यापुढे सदर प्लांटचे संचलन अहोरात्र योग्य सुरक्षित पद्धतीने व्हावे व कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी अशीही स्पष्ट सूचना रुग्णालय अधिष्ठाता याना दिली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातून आणलेली वाघीण झीनत सिमिलीपाल अभयारण्यात सोडली

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, भाजप पुन्हा कोणता निर्णय घेणार?

महायुतीच्या विजयामुळे शेअर बाजारात त्सुनामी, गुंतवणूकदारांनी 2 दिवसात 13 लाख कोटींची कमाई

वडिलांनी आपल्या जुळ्या मुलींना विष देऊन ठार केले, नंतर गळफास घेतला

लाडकी बहीण योजनेचा प्रभाव तर आहे, निकालानंतर शरद पवार यांनी स्वीकारले

पुढील लेख
Show comments