Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे निर्णायक आघाडीच्या दिशेने

Webdunia
रविवार, 2 मे 2021 (13:57 IST)
पंढरपूर पोटनिवडणुकीचं मतमोजणी सध्या चुरशीने सुरू असून 25व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 6334 हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे.
 
25व्या फेरीअखेर आवताडे यांना 75073 मतं मिळवली असून भालके यांना 68739 मतं मिळाली आहेत.
 
पंढरपूरमध्ये पहिल्या फेरीअखेर भालके आघाडीवर होते. पण नंतर आवताडे यांनी मुसंडी मारली. दोन्ही उमेदवारांच्या मतांमधील अंतर अतिशय कमी असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीत भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या सहा फेऱ्यांची मतमोजणी होईपर्यंत भालके आवताडे यांच्यापेक्षा पुढे होते. पण भालके यांच्या मतांची आघाडी शंभर-दोनशेच्याच घरात होती.
 
सहाव्या फेरीपासून आवताडे हेच आघाडीवर असून अद्याप त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.
 
दहाव्या-अकराव्या फेरीदरम्यान आवताडे यांची आघाडी अडीच हजारांपर्यंत गेली होती. पण तेराव्या फेरीअखेरीस ते 1035 मतांनी पुढे आहेत.
 
पंढरपूर मतदारसंघात भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांच्यातच थेट लढत होत असून त्यांच्यातील मतांचं अंतरही सुरुवातीपासून अत्यंत कमी आहे.
 
पंढरपूर पोटनिवडणुकीत 524 मतदान केंद्रांवर मतदान झालं. यामध्ये 2 लाख 34 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
 
पंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या एकूण 38 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे पुढील फेऱ्यांकडे सर्वांचं लक्ष असेल.
 
आतापर्यंत झालेली मतमोजणी ही पंढरपूर शहर परिसरातील होती.
 
पुढील फेऱ्यांमध्ये मंगळवेढा शहर तसंच ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे.
 
मंगळवेढ्यात समाधान आवताडे यांचा चांगला प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे इथं ते किती मतं घेतात याकडे लक्ष असेल.
 
त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांचा कौल कुणाला मिळतो, त्यानुसार या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.
 
मतमोजणीचं फेरीनिहाय चित्र -
पोस्टल मतांमध्ये भगीरथ भालके यांना आघाडी मिळाली
पहिल्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना 450 मतांची आघाडी
दुसऱ्या फेरीअखेर भगीरथ भालके यांना 5606 तर समाधान अवताडे यांना 5492 मते.
तिसऱ्या फेरीअखेर भारत भालके 635मतांनी आघाडीवर.
चौथ्या फेरीतही भालके यांची आघाडी कायम. भालके यांना 11941 तर आवताडे यांना 11303 मतं.
पाचव्या फेरीअखेर भालके यांना 14717 तर आवताडे यांना 14059 मते. भालके 658 मतांनी आघाडीवर.
सहाव्या फेरीअखेर भगीरथ भालके यांना 17418 तर आवताडे यांना 17218 मतं. भालके यांची आघाडी घटून 194 वर
सातव्या फेरीत आवताडे यांना आघाडी.
आवताडे यांना 20213 तर भालके यांना 19380 मतं
आठव्या आणि नवव्या फेरीतही आवताडे यांची आघाडी कायम
दहाव्या फेरीअखेर अवताडे यांना 28885 आणि भालके यांना 27047 मतं
11वी फेरी - अवताडे 30975 तर भालके यांची मतं 29667 वर
12व्या फेरीअखेरअवताडे यांना 33229 तर भालके 32015 मतं, आवताडे 1224 मतांनी आघाडीवर
13व्या फेरीअखेर समाधान अवताडे यांना ३५८९३ तर भगीरथ भालके यांना ३४८३४ मते.
14व्या आणि 15व्या फेरीतही आवताडे यांची आघाडी कायम
16 व्या फेरीअखेर आवताडे यांना 45 हजार 934 तर भालके यांना 44 हजार 706 मतं. आवताडे यांच्याकडे 1228 मतांची आघाडी.
18व्या फेरीअखेर समाधान अवताडे यांना 52 हजार 450 तर भालके यांना 51 हजार 384 मतं मिळाली.
त्यामुळे 18 व्या फेरीअखेर 1066 मतांनी आघाडीवर.
19 व्या फेरीअखेर आवताडे यांना 55 हजार 559 मतं तर भालके यांना 54 हजार 664 मतं. आवताडे यांची आघाडी घटून 895 वर. चुरस वाढली.
20व्या फेरीत आवताडे 58 हजार 787 मत मिळवून भालके यांच्यापेक्षा 1741 मतांनी पुढे. भालके यांना 57 हजार 46 मतं.
आवताडे यांची निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल
22व्या फेरीअखेर अवताडे यांना 64 हजार 810 मतं तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना 60 हजार 864 मतं. आवताडे 3946 मतांनी आघाडीवर.
23 व्या फेरीअखेर आवताडे समाधान अवताडे यांना 68 हजार 602 मतं तर भगीरथ भालके यांना 63 हजार 974 मतं. आवताडे यांची आघाडी वाढून 5682 वर
24 वी फेरी - आवताडे यांना मोठी आघाडी. 24 व्या फेरीअखेर आवताडे यांना 71 हजार 584 तर भालके यांना 65 हजार 528 मतं. आवताडे यांच्याकडे 6056 मतांची आघाडी.
25 व्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना 75 हजार 73 मतं मिळाली. तर भगीरथ भालके यांनी 68 हजार 739 मतं मिळवली. आवताडे यांना 6334 मतांची आघाडी
मतमोजणी संथगतीने
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
या दिशेने जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
 
पंढरपूरच्या शासकीय गोदामात सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
 
कोविड स्थितीमुळे मतमोजणी केंद्रावर फक्त 14 टेबलच मांडण्यात आली आहेत. परिणामी मतमोजणी संथगतीने होताना दिसत आहे.
 
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम निकाल यायला थोडा उशीर होऊ शकतो.
 
महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.
 
संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर शहर आणि याच तालुक्यातली 22 गावे मिळून हा मतदारसंघ बनतो. पंढरपुरातली उरलेली गावे ही माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडली आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या राजकीय घडामोडींचा सरळ प्रभाव हा या तालुक्यांवर पडतो, असं समजलं जातं.
 
या पोटनिवडणुकीत अनेक उमेदवार उभे आहेत. पण मुख्य लढत ही आवताडे आणि भालके यांच्यात आहे.
 
भगीरथ भालके यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला असला, तरी सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने आहे. भारत भालकेंचा जनसंपर्क भगीरथ यांच्या कामी येण्याचा अंदाज आहे.
 
पण दुसरीकडे समाधान आवताडे यांचा स्वतःचा जनसंपर्क चांगला असल्याचं मानलं जातं. पंढरपुरातल्या सुधारक परिचारक यांच्या गटाने त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. यामुळेच ही लढत अटीतटीची मानली जातेय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य नाही म्हणाले नाना पटोले

LIVE: संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा नवा चेहरा यावर भाष्य केले

मद्यधुंद ट्रक चालकाने झोपलेल्या लोकांना चिरडले, 5 जणांचा दुर्देवी मृत्यू

Android यूजर्ससाठी मोठा धोका ! सरकारने दिला इशारा

26/11 Mumbai Attack : कोण होते ते Real Hero ? ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन इतरांचे जीव वाचवले

पुढील लेख
Show comments