Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चर्चमध्ये फादरने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा केला प्रयत्न

Webdunia
सोमवार, 20 डिसेंबर 2021 (08:31 IST)
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका चर्चच्या फादरला आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली आहे. सुदैवाने यात फादरचे प्राण वाचले आहेत.
नाशिकच्या शालिमार येथील सेंट थॉमस चर्च मध्ये ही घटना घडली आहे. या चर्चमध्ये फादरने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बिशप शरद गायकवाड यांच्या समोर फादर अनंत आपटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बिशप गायकवाड यांच्या जाचाला कंटाळूनच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फादर अनंत आपटे यांनी केला आहे. मात्र पहिल्यांदाच अशी घटना चर्च मध्य घडल्याने खळबळ उडाली आहे.
 
फादर अनंत आपटे यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी शेजारी प्रार्थना करत असलेल्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घटनेनंतर फादर आपटे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments