पेरणीच्या तोंडावर खताच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांवर अधिकचा बोजा पडणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल डीझेल दर रोज वाढत असल्याने नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे आता शेतकरी वर सुद्धा चांगलाच अडचणीत सापडला आहे. आधीच भाव नाहीत वर हे अश्या किंमती वाढत आहेत.
शेतकऱ्यांना खते खरेदी करताना पोस्ट प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र खताचा व्यवहार पारदर्शक होण्यासाठी आग्रही असलेलं प्रशासन वाढणाऱ्या खताच्या किंमती करण्यास अपयशी ठरले आहे. जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. अनेकांच्या डोक्यावर अजूनही कर्जाचा बोजा आहे. या परिस्थितीमध्ये पेरणीच्या तोंडावर खताच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने शेतकरी हतबल
दिसतोय. तर अजूनही हरबरा खरेदी झाली नाही. सत्ता बदल झाला मात्र शेतकरी वर्गाच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही.
खताचा प्रकार जुना दर आताचा दर
15 : 15 : 15 887 975
18 : 46 : 0 1076 1258
20 : 20 : 0/13 850 930
10 : 26 : 26 1055 1135
12 : 32 :16 1061 1145
24 : 24 : 0 1015 1110