rashifal-2026

Shirdi Bandh 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक

Webdunia
गुरूवार, 27 एप्रिल 2023 (13:40 IST)
Shirdi Bandh News महाराष्ट्रातील शिर्डी येथील साई बाबा मंदिर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. दरम्यान 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.
 
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिराला उडवून देण्याच्या धमक्या आल्यामुळे केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेसाठी CISF नियुक्तीच्या निणर्यला नागरिकांनी विरोध केला आहे. तसेच येत्या 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे. 
 
शिर्डीतील साई मंदिराला महाराष्ट्र पोलीस, संस्थेचे सुरक्षा रक्षक, कंमाडो, बॉम्बशोधक पथकासह विविध प्रकारची सुरक्षा देण्यात आलेली आहेत. मात्र ही सुरक्षा कमकुवत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी मागणी केली की साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी. यावर साईबाबा संस्थानने कोर्टाच्या निर्देशानंतर केंद्रीय सुरक्षा लागू करण्यास तयारी दाखवली. मात्र शिर्डीतील नागरिकांनी विरोध करत निर्णयाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. 
 
शिर्डी सर्वपक्षीय ग्रामस्थ आता 1 मे पासून बेमुदत बंद पाळणार आहेत. शिर्डी बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"तुरुंगात पाठवीन," गडकरींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना इशारा देत नागपूर महानगरपालिका आयुक्तांनाही फटकारले

गोवा आग दुर्घटनेतील लुथरा बंधूंना भारतात आणण्यात आले; विमातळावर अटक

ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी

'वधूला परत करा आणि तुमच्या वडिलांना घेऊन जा', वराची पोलिसांकडे धाव; वाशीम मधील घटना

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात कारवाई न झाल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments