Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंदू मिलच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणी कार्यक्रम रद्द

इंदू मिलच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणी कार्यक्रम रद्द
, शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (17:01 IST)
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे राजकीय वाद रंगला होता. महाविकासआघाडी सरकारमध्ये अहंकार निर्माण झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनीही सरकारने कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 
 
या सगळ्या गोंधळासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे. या कार्यक्रमाला केवळ १६ जणच निमंत्रित होते. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही केवळ महाविकासआघाडीतील नेत्यांची नावे नमूद करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती. अजित पवार पुण्यात असताना त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. ज्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची  कल्पना नव्हती.
 
स्मारकाचा आराखडा बदलण्यापासून ते पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय मुंडे यांच्या खात्याने घेतला होता. शरद पवारांनी स्मारकाच्या बदललेल्या आराखड्याची इंदू मिल इथे जाऊन पाहणी केली होती. मात्र, शरद पवारांनीही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.या स्मारकासाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नव्हते, आनंदराज यांना  सकाळी निमंत्रण देण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूरमध्ये भाज्या महाग झाल्या, भाज्यांचे दर दुप्पट झाले