Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नांदेड मध्ये नेट बंद, अफवा पसरू नये म्हणून काळजी

नांदेड मध्ये नेट बंद, अफवा पसरू नये म्हणून काळजी
भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंद दरम्यान बुधवारी नांदेड  जिल्ह्यात घटनेचे तीव्र पडसाद उमटले. यामध्ये  हदगाव येथील पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाच्या मृत्यू झाला होता. त्यामुळे  नांदेड  जिल्ह्यातील  वातावरण अजून चिघळले आहे. त्यामुळे आजही जिल्ह्यात सोशल मिडीयावरून अफवा पसरवू नये व कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा शुक्रवार सकाळी १० वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हधिकारी यांनी दिले. त्यामुळे अफवा पसरणार नाही आणि चुकीची माहिती पसरून कोणतीही अनुचित घटना होणार नाही असे प्रशासनाने कळविले आहे.

नांदेड येथील हदगाव येथील  पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण  जिल्ह्यातील वातावरण तापले होत ते आजही शांत झाले नाही. तर दुसरीकडे  सोशल मिडियावरून अफवा पसरवू नयेत व कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित असावी  म्हणून जिल्ह्याधिकारी अरुण डोंगरे यांनी इंटरनेट सेवा बंद  करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता  शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.पोलिसांनी केलेल्या मारझोडीचा नागरिकांनी निषेध केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ शॉवर घेऊ नका, खेळाडूंना सूचना