Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाकरे सरकारमधील सहा मंत्र्यांचा परिचय

Webdunia
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (11:41 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवतीर्थावर झालेल्या या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरेंसह एकूण सहा मंत्र्यांचाही शपथविधी झाला. यामध्ये शिवसेनेचे सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांचा परिचय...
शिवसेनेचे डॅशिंग नेते : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. सलग चारवेळा निवडून आलेले एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या संघटनातही मोठे योगदान आहे. शिवसेनेने 24 ऑक्टोबरच्या निकालानंतर शिंदे यांचीच गटनेता म्हणून निवड केली. यापूर्वी ते फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेमंत्री होते. शिंदे पहिल्यांदा 1997 ला ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. एकूण दोनवेळा ते नगरसेवक होते. 2004 ला ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
निष्ठावंत शिवसैनिक : सुभाष देसाई
दिवंगत शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक सुभाष देसाई हे मुंबईतील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत. उध्दव ठाकरेंसोबतच त्यांनीही  मंत्रिपदाची शपथ घेतली. गोरेगाव मतदारसंघातून ते 1990, 2004 आणि 2009 ला आमदार झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांनी उद्योग मंत्रालय सांभाळले. शिवाय ते मुंबईचे पालकमंत्रीही राहिले. 
काँग्रेसचे नेते : बाळासाहेब थोरात
7 मार्च 1953 रोजी बाळासाहेब थोरात यांचा जन्म झाला. सहकारी चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. संगमनेर आणि अकोला येथून त्यांचा राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. संगमनेर जिल्हा आणि राज्य सहकारी बँकेचे अध्क्षपद त्यांनी भूष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महसूल, कृषी आणि खार जमीन खाते त्यांनी यशस्वीपणे सांभाळले. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरेजावे लागले होते. यानंतर प्रदेशाध्क्षपदी असलेल्या अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व घडामोडींनंतर बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्क्षपदावर नियुक्ती करण्यात आली. 
तीन्ही पक्षांमध्ये प्रवास केलेला नेता : छगन भुजबळ
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, नंतर काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. तीन पक्षांची बैठक होत होती, तेव्हा आपल्याला या तीनही पक्षात काम केल्याचा अनुभव आहे, जुने सहकारी एकत्र येत असल्याची भावना भुजबळांनी व्यक्त केली होती. 1995
ला युतीचे सरकार आले, तेव्हा शिवसेनेने माझगाव मतदारसंघातून भुजबळांचा पराभव केला. पण दुसर्‍याच वर्षी शरद पवार यांनी भुजबळांना विधानपरिषदेवर घेतले आणि थेट विरोधी पक्षनेतेपदाचा मान दिला. 
अमेरिकेतील शिक्षण सोडून राजकारणात आलेला नेता : जयंत पाटील
1962 ला जन्मलेले जयंत पाटील हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या कॅबिनेटमध्ये ग्रामविकासमंत्री होते. त्यापूर्वी त्यांनी अर्थ मंत्रालयाचीही जबाबदारी सांभाळली. दिवंगत नेते राजारामबापू यांचे ते चिरंजीव आहे. राजारामबापू यांच्या अकाली निधनानंतर जयंत पाटील यांना अमेरिकेतील उच्च शिक्षण सोडून देशात परतावे लागले. जयंत पाटील यांच्या नावावर वित्तमंत्री म्हणून अनोखा विक्रम आहे. ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर 2008 या काळात त्यांनी नऊवेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. 2003 ते 2004 या काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था संकटात असतानाही त्यांनी चांगले काम करत पुन्हा अर्थव्यवस्थेला उभारी दिली होती.
काँग्रेसला विदर्भात बळ देणारा नेता : नितीन राऊत
काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष नितीन राऊत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यावर कोणती जबाबदारी देणार ते स्पष्ट नसले तरी काँग्रेसने विदर्भात पक्षाला बळ देणार्‍या नेत्याची निवड केली आहे. राऊत यांच्याकडे काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचीही जबाबदारी आहे. यापूर्वी त्यांनी आघाडी सरकारमध्ये  जलसंवर्धन विभागाची जबाबदारी सांभाळली आहे. मतदारसंघावर मजबूत पकड असणारा नेता म्हणून त्यांनी ओळख आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संजय राऊतच्या आरोपांना उत्तर दिले म्हणाले-

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments