rashifal-2026

उशिरा मिळालेल्या ओबीसी आरक्षणावर लगेच़़च घाला घालणे अन्यायकारक- विजय राऊत

Webdunia
सोमवार, 23 मे 2022 (08:29 IST)
मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार लागू करण्यात आलेल्या नागरीकांचा मागास प्रवर्ग बीसीसी या आरक्षणाचे आम्ही समर्थन करतो.मुळात जातिव्यवस्थेमुळे मागास वर्गाला राजकारणामध्ये अजूनही योग्य ते प्रतिनिधित्व मिळत नाही. मुळात देशांत ६०-७०% पेक्षा अधिक लोकसंख्या ओबीसी घटकांची असून देखील मिळालेले आरक्षण तोकडे आहे..ओबीसी आरक्षण हे महाराष्ट्रात 1994 मध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर खूप उशिरा मिळाले आणि लगेच़़च त्याच्यावर घाला घालणे हे अन्यायकारक आहे असल्याचे मत उत्तर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत यांनी व्यक्त केले.
 
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या  शिष्टमंडळाने ओबीसी समर्पित आयोगाकडे निवेदन सादर केले त्यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत,प्रदेशउपाध्यक्ष मिलिंद चित्ते,सरचिटणीस यशवंत खैरनार,शहर कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष गौरव सोनार,सरचिटणीस अनिल कोठुळे,सचिव मयूर वांद्रे ,सातपूर विभाग अध्यक्ष चंद्रकांत निर्वाण,सरचिटणीस इसाकचाचा कुरेशी,सरचिटणीस अभिजीत राऊत, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे,नितीन अमृतकर,नंदकुमार येवलेकर,सचिन दिक्षित,रोहन वेलदे,अशोक लहामगे,अरुण नंदन,अण्णा कोठुळे,महेश गायकवाड,मयूर मोटकरी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकार पशुपक्षांची जनगणना करते पण ओबीसी जनगणना करत नाही आणि केलीच तर आकडेवारी जाहीर करत नाही त्यामुळे ओबीसींची जातिनिहाय जनगणना होऊन ओबीसींच्या संख्येनुसार प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या भरवश्यावर न बसता राज्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्यासाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन करून त्वरित सर्व जातीनिहाय जनगणना करून सर्व जातींना न्याय देण्याचे कार्य केले तर छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतीराव फुले ,छत्रपती शाहू महाराज ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल.
 
मागासवर्गीयांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समर्पित आयोगाणे शासन स्तरावर मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हापरिषद सी.ई.ओ ,पंचायत समिती विस्तार अधिकारी,ग्रामसेवक यांच्या स्तरावर १९९४-९५ पासून निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगरपालिक ,नगरपरिषद व महानगरपालिका नगरसेवक तसेच ओबीसी घटकातून झालेले पदाधिकारी यांची माहिती तत्काळ मिळणे सोपे जाईल त्यामुळे आयोगाने सर्व विभागांना आदेशित करून तत्काळ मिळवावी व आधी एम्पिरिकल डेटा गोळा करून तयार झालेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यास ओबीसींना न्याय मिळेल.आयोगाने ओबीसी घटकांना निवेदने देण्यासाठी व आपले मत मांडण्यासाठी फारच कमी अवधी देण्यात आला आहे.शिवाय आयोगाची मुदत संपत आली असताना निवेदने स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली गेली हे देखील अतिशय अयोग्य आहे. विभागीय महसूल कार्यालयांना भेटी देण्याचा कार्यक्रम यापूर्वीच हाती घ्यायला पाहिजे होता. आयोगाची मुदत कमी राहिली असताना ही प्रक्रिया सुरू करण्याचा नक्की हेतू काय आहे.

आयोगातील सगळे सदस्य शासकीय अधिकारी आहेत ओबीसी समाजात प्रत्यक्ष काम करणारे नाहीत. प्रत्यक्ष काम करणाऱ्या जाणकारांशी चर्चा करून आपणाकडून त्यांचाही सल्ला घेतला जावा. एकंदरीत आयोगाची कार्यपद्धती ओबीसी विरोधी असल्याचे दिसून येत आहे.या आयोगाचा असा विचार दिसतो की सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्द्यांवर आरक्षण नाकारले जाईल अशाच पद्धतीचा अहवाल दिला जाईल. असे घडल्यास ओबीसींकडून महाराष्ट्रभर उग्र आंदोलन छेडले जाईल त्यामुळे आयोगाने आरक्षण वाचवण्यासाठी मेहनत घ्यावी असे मत व्यक्त केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यात शाळकरी मुलासोबत शिक्षकाने केले अश्लील कृत्य, गुन्हा दाखल

LIVE: महायुती सरकारने २२ वर्षांचा रोडमॅप निश्चित केला

ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी; 16 वर्षांखालील मुले फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरू शकणार नाहीत

भारताने दक्षिण आफ्रिकेला 74 धावांत गुंडाळून 101 धावांनी मोठा विजय मिळवला

आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमान कारवर आदळले

पुढील लेख
Show comments