Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव: देवीची मूर्ती अंगावर पडून तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Webdunia
सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (09:14 IST)
jalgaon: नवरात्रोत्सवच्या निमित्ताने देवीची 9 दिवस स्थापना केली जाते. ठीक ठिकाणी मंडप बांधून देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी गेलेल्या तरुणावर वाहनाचा अपघात होऊन मूर्ती अंगावर पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे. 
 
जळगावच्या मेहरूण परिसरात जोशीवाडा येथे राहणारा तरुण देवीची मारुती बऱ्हाणपूरला आणायला गेला. मूर्ती परत आणताना पुर्नाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाला आणि त्यात मूर्ती तरुणाचा अंगावर पडली आणि त्याचा मृत्यू झाला. संजय कोळी उर्फ जितू असे या मयत तरुणाचे नाव आहे. 
 
जळगावच्या मेहरूण परिसरात जोशीवाडा कॉलोनीत नवरात्रोत्सवासाठी देवीची मूर्ती बसवण्याची तयारी झाली. मंडळाचे काही कार्यकर्ते देवीची मूर्ती बऱ्हाणपुरातून आणण्यासाठी शनिवारी गेले असता रात्री परत येताना पुराणाड फाट्या जवळ वाहनाचा अपघात झाला. या अपघातात संजयवर देवीची मूर्ती पडली. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. 

त्याच्या मृत्यूची त्याच्या कुटुंबियांना फोनने सूचना दिली. हे कळतातच त्यांनी हंबरडा फोडला. त्याच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ ,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,  असा परिवार असून मयत संजय जळगाव एमआयडीसी च्या एकाच खासगी कंपनीत खिडक्यांच्या सेंटरिंगचे काम करत होता . मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात त्याच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू ची नोंदणी केली आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल,असे एकनाथ शिंदे म्हणाले

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments