Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कृष्णा नदीच्या दुषित पाण्याचा मुद्द्यावरून जयंत पाटलांनी विधानसभेत वेधले लक्ष

Jayant Patil
, सोमवार, 20 मार्च 2023 (21:24 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधिमंडळाचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत कृष्णा नदीच्या दुषित पाण्याचा मुद्दा आज उपस्थित केला.सांगली शहरानजीक कृष्णा नदीत मळी मिश्रीत पाणी मिसळल्याने हजारो मासे मृत पावले आहेत.यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचनेदरम्यान जयंत पाटील यांनी हा मुद्दा मांडला.
जयंत पाटील सभागृहात म्हणाले की, स्वप्नपूर्ती डिस्टलरीचा पाईप फुटल्याने पाणी दूषित झाल्याचे प्रथमदर्शनी दिसले आहे. वसंतदादा शेतकरी साखर कारखाना दत्त इंडिया कंपनी या कंपनीला चालवण्यासाठी दिलेला आहे. मात्र डिस्टलरी त्यांच्याकडे दिलेली नाही अशी माहिती आहे. ही डिस्टलरी अधिकृत आहे का? नसल्यास त्याचा मालक कोण आहे? किती काळापासून ही डिस्टलरी सुरू आहे? या डिस्टीलरीच्या माध्यमातून कोणाला फायदा व्हायचा ? अशा प्रश्नांचा भडीमार जयंत पाटील यांनी केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विजय ताड यांच्या हत्येचा उलगडा; आरोपींना कर्नाटकातून अटक