rashifal-2026

झोपड्या पाडा आणि ठाण्याचे स्मशान करा- जितेंद्र आव्हाड

Webdunia
ठाणे महानगरपालिकेने कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत असणाऱ्या झोपड्या पाडण्याचा ठराव पारीत केला आहे. या ठरावाच्या निषेधार्थ सुमारे ३५ हजार झोपडीधारकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा नाका येथे मोर्चा नेला. दरम्यान, यावेळी आव्हाड यांनी शिवसेना- भाजपवर टीका केली. या सत्ताधाऱ्यांना ठाण्याचे स्मशान करायचे आहे. पण, लक्षात ठेवा या सुंदर स्मशानात सेना- भाजपची चिता ठाणेकरच रचतील, असा इशारा यावेळी त्यांनी या ठिकाणी दिला.
 
ठाणे महानगरपालिकेने ठाण्यातील झोपड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असता, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी अधिवेशनात आवाज उठवून या कारवाईला स्थगिती मिळवली होती. मात्र, महासभेमध्ये सेना- भाजपने ठराव करुन सदर झोपड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी हा मोर्चा काढण्यात आला. मनिषा नगर, जानकी नगर, खारीगाव, घोळाई नगर, आतकोनेश्वर नगर आदी भागातील सुमारे ३५ हजार नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मनिषा नगरमधून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामुळे नवी मुंबई आणि रेतीबंदरकडे जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती.
 
यावेळी आव्हाड यांनी पालिका प्रशासनावर टीका केली. २००० पर्यंतच्या झोपडयांना अभय देण्याचा कायदा असतानाही ८० वर्षांपूर्वीच्या झोपडया पाडण्याचा घाट घातला आहे. शहर सुंदर करण्याच्या नादात प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधारी लोकांना बेघर करीत आहेत. या सत्ताधाऱ्यांनी सौंदर्याची व्याख्या काय केली आहे, हे सांगणे अवघड आहे. बायकोच्या गालावर मुरुम आला तर सुंदर बायकोला घटस्फोट देण्याचाच हा प्रकार आहे. मात्र, या भागातील एकही झोपडी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावरच उतरु; हे शहर आमच्या घामाने सजले आहे. त्यामुळे जर गोरगरीबांना बेघर केले. तर, हे गोरगरीब बंड करतील आणि त्यातून हे सत्ताधारी नगरसेवक माजी नगरसेवक म्हणून गणले जातील. झोपडया पाडून आयुक्त जयस्वाल, ठराव मांडणारे भाजपचे मिलींद पाटणकर आणि अनुमोदन देणाऱ्या सेनेच्या अनिता गौरी यांना या शहराचे सुंदर स्मशानात रुपांतर करायचे आहे. पण, त्यांनी लक्षात ठेवावे; या स्मशानात सेना- भाजपची चिता रचल्याशिवाय हा गरीब माणूस स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

५ हजारांची साडी ५९९ रुपयांत, या ऑफरमुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीत तीन महिला बेशुद्ध पडल्या

लग्नाला उपस्थित आप नेत्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याविरुद्ध नामांकन प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप, जेडीएसने तक्रार मागे घेतली

शालेय मॅरेथॉननंतर १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला होता

अकोल्यातील ओवेसींच्या रॅलीत चेंगराचेंगरी, पोलिसांनी लाठीचार्ज केला

पुढील लेख
Show comments