Festival Posters

राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

Webdunia
राज्यपाल विद्यासागर राव विधान भवनात पोहोचताच विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, तेव्हा राज्यपालांनी RSS चे समर्थन केले होते. म्हणून विरोधी पक्षांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरही बहिष्कार घातला.
 
राज्यपाल हे सरकारच्या वतीने ‘माझे सरकार हे करणार आहे,’ असे अभिभाषणात सांगतात. परंतु यांच्या सरकारने आजवरच्या अधिवेशनात सांगितलेली एकही गोष्ट केलेली नाही, उलट असहिष्णुतेचे वातावरण पसरवले, असा आरोप या वेळी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला.
 
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांना आपले मत मांडले म्हणून भर सभेत खाली बसवण्यात आले, सचिन तेंडुलकरला मत मांडले म्हणून देशद्रोही ठरवण्यात आले. हे देशात काय चालले आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. नथुराम गोडसेच्या जन्मदिनी शौर्य दिन साजरा करण्यात आला, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही त्याबाबत काहीच कारवाई केली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

मुंबईतील दहिसर मध्ये दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार; तरुणाला अटक

LIVE: मुलुंड मेट्रो अपघातावर एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित

नाशिकमधील उद्योजकाचा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर गुजरातमध्ये नर्मदा नदीत बुडून मृत्यू

होळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई वरून वाराणसी आणि गोरखपूरकरिता विशेष गाड्यांची घोषणा

पंतप्रधान मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जिओ पवेलियनला भेट दिली

पुढील लेख
Show comments