rashifal-2026

अंधश्रद्धेचा कळस विवाहितेला उपाशी ठेवणे, मध्यरात्री दर्गा साफ करायला लावणे कासवाला आंघोळ

Webdunia
बुधवार, 10 जुलै 2019 (16:42 IST)
क्रूर, अघोरी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. गुप्तधनासाठी दोन महिने नवविवाहितेचा क्रूरपणे छळ केल्याचं समोर आले आहे. चिमूर तालुक्यातल्या सावरी-बीडकर गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. अंधश्रद्धेने विकृत झालेल्या सुशिक्षित-मातब्बर कुटुंबाने, गुप्तधनासाठी नवविवाहितेला दररोज रात्री अडीच वाजता घरातील दर्गा धुऊन-जिवंत कासवाला मुरमुरे भरवण्यास लावले होते. जवळपास 50 दिवस उपासमार, मारझोड आणि अघोरी प्रकारामुळे भेदरलेल्खया, घाबरलेल्चया नवविवाहितेची अंनिसने कशीबशी सुटका केली. २०१८ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीच्या वाघाडे कुटुंबातील सविता यांचा विवाह सावरी बीडकर गावातील समीर गुणवंत यांच्याशी झाला. लग्नानंतर छळन्याचा अघोरी प्रकार लग्नाच्या पहिल्याच रात्री सुरु झाला. लग्नानंतर पहिल्याच रात्री सविताच्या सासरच्यांनी तीला अडीच वाजता उठून, घराच्या अंगणात असलेल्या पुरातन दर्ग्याची स्वच्छता करून ते धुण्यास सांगितले. त्यासोबत तेथे असलेल्या जिवंत कासवाला आंघोळ घालून, पूजा अर्चना करत तब्बल दोन तास मुरमुरे खाऊ घालण्यास सांगितले गेले. याच वेळी समीरच्या अंगात आले आणि त्याने सविताला बेदम मारत चटके देण्यास सुरुवात केली. यात सासू-सासऱेही सहभागी होते. समीर यांच्या घराला उंच संरक्षक भिंत होती. त्यामुळे समीर यांच्या घरात सुरु असलेला अघोरी प्रकार शेजारच्यांच्याही लक्षात आला नाही. तसंच हे कृत्य करताना सविताला दिवसभर उपाशी ठेवले जायचे. त्यामुळे तीला पहिल्या दिवसांपासून काहीच खाण्यासाठी दिले गेले नाही.हा अघोरी प्रकार केल्याने पुरातन दर्ग्याच्या खाली असलेले गुप्तधन या सर्व विधींमुळे आपोआप वर येईल, अशी या आरोपी कुटुंबाची धारणा होती. त्यामुळे ते सवितावर अत्याचार करत तिचा अघोरीपणाने छळ करत होते. सविताने माहेच्या लोकांकडे संपर्क करू नये म्हणून तिच्याकडील फोनही सासू-सारऱ्यांनी काढून घेतला.या सर्व प्रकारात सवितासमोर सासरच्यांची धक्कादायक माहिती समोर आली. नवरा समीरचे ही तिसरे लग्न असल्याचे तिला समजले. सविताने या छळातून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि माहेरच्यांशी संपर्क केला. त्यावर तिच्या वडिलांनी सविताला माहेरी घेऊन गेले. सवितावर केलेल्या छळाविषयी तिच्या वडिलांनी पोलीसांत तक्रार दाखल केली. मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नव्ह्ती. आता समीर चौथे लग्न करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सविताच्या कुटुंबाने त्यांना धडा शिकवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याविषयी माहिती दिली. त्यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

अमरावती निवडणुकीत भाजपच्या पराभवाचे विश्लेषण केले जाईल-चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: लाडकी बहीण योजनेसाठी आता आधार प्रमाणीकरण अनिवार्य

घराबाहेर उन्हामध्ये बसलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना कारने चिरडले

लाडकी बहीण योजनेतील महिला हप्त्यांच्या प्रतीक्षेत, बुलढाणा जिल्ह्यातील महिलांनी निषेध केला

दिवसाढवळ्या आरडी एजंटची निर्घृण हत्या; गडचिरोली मधील घटना

पुढील लेख
Show comments