Marathi Biodata Maker

पुण्याला मोठा दिलासा खडकवासला धरण पूर्ण भरले

Webdunia
गुरूवार, 11 जुलै 2019 (16:20 IST)
मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यातही मागील आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे. खडकवासला धरण भरल्यानंतर आता मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्गही सुरू केला आहे. या पाण्याच्या विसर्गानंतर नदीकाठी असलेल्या ग्रामस्थांना सासनाने सतर्कतेचा इशाराही दिला आहे. मुसळधार सततच्या पावसाने खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे. यानंतर मध्यरात्री दोन वाजल्यापासून मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यानंतर नदीकाठच्या ग्रामस्थांना सावध राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. कारण मुठा नदी पात्रात विसर्ग करण्यात आलेल्या पाण्याचा वेग १७०० क्युसेक इतका आहे.पुरेसा जलसाठा झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. कारण असे अनेक ठिकाणं आहेत जिथे कमी प्रमाणात पाऊस झाला आहे आणि तेथील धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. पिंपळगाव, जोगे, घोड आणि नाझरे या धरण क्षेत्रात खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे खकडकवासला धरण पूर्ण भरल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. आणखी दिलासादायक बाब अशी की, केवळ खडकवासलाच नाही तर, पुण्यातील कळमोडी धरणही शंभर टक्के भरले आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

मुंबईत अवैध शस्त्रांसह पाच जणांना अटक

महाराष्ट्रात २१ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप

अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची सुनेत्रा पवार यांच्याशी भेट

दिल्ली उच्च न्यायालयाच्या वकिलाची हॉटेलच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

चार वर्षांच्या भाचीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणारा मामा चकमकीत ठार

पुढील लेख
Show comments