Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शहराध्यक्षांसह 60 ते 70 जणांवर गुन्हा

Webdunia
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (10:20 IST)
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या शनिवारी (ता.5) सायंकाळी पुणे महानगरपालिकेत आले होते. ते जुन्या इमारतीच्या मेनगेटने पायऱ्यांवरून जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते बेकायदेशीर जमाव जमवून तेथे आले. त्यांनी सोमय्या यांना आत जाण्यापासून रोखले. एकाने त्याच्या अंगातील शर्ट काढून तो हवेत भिरवला व त्या शर्टने सोमय्या यांना फटका मारला. त्यानंतर सोमय्या यांची कॉलरपकडून हाताने जोर लावून खेचले व त्यांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने तिसऱ्या पायरीवरून ओढले. त्यामुळे सोमय्या पडले व त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागला. 
 
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रशांत लाडे (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, भादवी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४ तसेच मु.पो.अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ नुसार शहरअध्यक्ष संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनि गवते यांच्यासह ६० ते ७० महिला व पुरूष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अजित पवारांच्या दाव्याला सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, 'अजित पवार खोटे बोलत आहेत', मानहानीचा गुन्हा दाखल करणार

LIVE: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात बजावला मतदानाचा हक्क

विजय निश्चित आहे म्हणाल्या शिवसेना नेत्या शायना एनसी

विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेसने चौकशीची मागणी केली

VIDEO तरुणी फक्त टॉवेल गुंडाळून इंडिया गेटवर पोहोचली, केला अश्लील डान्स

पुढील लेख
Show comments