Dharma Sangrah

कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातील खामगावात पडसाद, राष्ट्रीय महामार्गावर फोडली एसटी

Webdunia
मंगळवार, 2 जानेवारी 2018 (15:34 IST)
पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटात झालेल्या वादाचा निषेध करण्यात येत आहे. याचे पडसाद खामगाव तालुक्यातही उमटले. निषेध म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्री गवळी येथे एका एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
एमएच-१४ बीटी -३२७४ या अकोला-नाशिक या बसवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीदरम्यान बसमध्ये २६ प्रवासी तसेच चालक आणि वाहक होते. या प्रकरणी चालकाने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे. दरम्यान, बसमधील प्रवासी सुखरूप असून एसटी बस खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरात आणण्यात आली आहे.  
 
अकोल्यात तीव्र पडसाद
दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्ह्यातही उमटले. संतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला.अकोला शहरात काही युवकांनी सातव चौक, जठारपेठ, राऊतवाडी, लहान उमरी, रतनलाल प्लॉट चौक, केडीया प्लॉट, नवीन कपडा बाजार परिसरातून मोर्चा काढला व बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर आकोट व लोहारा येथे काही युवकांनी बसची तोडफोड केली. दरम्यान, सर्व ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे.
 
मुंबईतही हिंसक पडसाद
भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईमध्येही हिंसक पडसाद उमटले आहेत. कुर्ला, मुलुंड व चेंबूर परिसरात निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मुलुंडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टेशन रोड परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मुंबई बुलडोझर कारवाई : वांद्रे दंगलीप्रकरणी १० जणांविरुद्ध एफआयआर

LIVE: फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय जाहीर केले; जूनपासून कर्जमाफी सुरू होणार

चारधाम यात्रेत भाविकांचा महापूर

महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता

आधी शाईफेक, आता अटक! जाणून घ्या कोणत्या एका चुकीमुळे राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात

पुढील लेख
Show comments