Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस नव्या रुपात येणार

kokankanya
, शुक्रवार, 3 मे 2019 (16:42 IST)
कोकणवासीयांमध्ये लोकप्रिय असलेली कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस नव्या रुपात येत आहे. या मेल, एक्स्प्रेसला इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) प्रकारातील डब्यांऐवजी लिके होल्फमन बुश (एलएचबी) लावण्यात येणार आहेत. त्यामुळे डब्यातील आसन क्षमता वाढली जाणार असल्याने दोन डबे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ही मेल, एक्स्प्रेस २४ डब्यांऐवजी २२ डब्यांची असेल. यामुळे डब्यांची लांबी-रूंदी, मोठे प्रवेशद्वार, सुधारित रचनेचे बेसीन आणि शौचालय यामध्ये आधुनिकता येईल. या गाडीची संरचना प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी एसीचा एक डबा, द्वितीय श्रेणीचा एक डबा, तृतीय श्रेणीचे ४ डबे, स्लीपरचे डबे ११, सामान्य डबे ४, पँट्री कारचा एक डबा, एसएलआरचे २ असे २४ डबे आहेत.नव्या रचनेमुळे कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये १२४ प्रवासी क्षमता आणि मांडवी एक्सप्रेसमध्ये ९४ प्रवासी क्षमता वाढली आहे. येत्या १० जूनपासून ते ३१ ऑगस्टपर्यंत कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला एलएचबी कोच लावण्यात येईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुत्र्याने खाल्ले 14000 चे नोट, काढण्यासाठी खर्च करावे लागले 12000