Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kolhapur : सिगारेट ओढत कोल्हापुरात पोरींचा धिंगाणा! मुलींच्या विरोधात तक्रार

Webdunia
मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (11:59 IST)
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पोस्टर समोर धिंगाणा घालत सिगरेट  ओढत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. डीजेच्या तालावर सिगरेट ओढत, नशापान करत मुली थिरकत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. कोल्हापुरातील हा प्रकार असून या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. शिव-शाहू प्रेमींमध्ये या व्हिडीओ विरोधात संतापाची भावना उसळली आहे.सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये डीजे लावले असून त्याच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शाहू महाराजांचे पोस्टर लावण्यात आले आहे. डीजेवर चंद्रमुखी गाण्याचं रिमिक्स सुरु असून डीजेच्या स्पीकरच्या समोर गर्दी असून त्या गाण्याच्या तालावर तरुण आणि तरुणी नाचत आहे. त्या गर्दीत काही तृतीयपंथी असल्याचंही दिसत आहे. काही मुली सिगारेट ओढत असताना दिसत आहे. हा व्हिडीओ 19 सेकंदाचा आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. शिवप्रेमी आणि शाहूप्रेमी यांनी या व्हायरल व्हिडीओनंतर संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणीही केली जात आहे.शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले लक्ष्मीपुरी कोल्हापूर पोलिस ठाण्यात या व्हायरल व्हिडीओप्रकरणी मुलींविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
<

एककीकडे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरीकडे शाहू महाराज आणि समोर डीजे तालावर जे काही सुरु आहेत, ते भयंकरच आहे, घटना आपल्या कोल्हापूर मधील.. चंद्रमुखी गाण्यावर थिरकताना तोंडातून सिगरेटचे धूर निघतायेत.. आणि विचारांची राख झालीये! #Kolhapur pic.twitter.com/n4BNIfqKyz

— Siddhesh Sawant (@ssidsawant) August 16, 2022 >
काय आहे प्रकरण जाणून घ्या -
श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी जग म्हणून  तृतीयपंथीयांचा एक धार्मिक कार्यक्रम  केला जातो. हा एक धार्मिक कार्यक्रम आहे. यावेळी मंडळांकडून तृतीयपंथीयांचं वेगळ्या प्रकारे स्वागत केलं जातं. जसे की त्यांचे पाय धुणे, त्यांचा सन्मान करणे, इत्यादी प्रकारे तृतीय पंथीयांचं स्वागत वेगवेगळ्या मंडळांकडून केलं जात असे. पण गेल्या काही वर्षात या सगळ्या गोष्टींच रूप बदललं आहे. धार्मिक समारंभात डीजेच्या तालावर नाचण्याचा प्रकार घडत आहे. 
 
 
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments