Festival Posters

कोल्हापूर : कळंबा कारागृह अधीक्षकांवर कैद्याचा हल्ला

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (07:36 IST)
कोल्हापुरातील कळंबा कारागृहात एका कैद्याने कारागृह अधीक्षकांवर हल्ला केला आहे. कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदलकर यांच्यावर मंगळवारी बरंक तपासणीवेळी हा हल्ला झाला. जन्मठेप भोगत असलेल्या कैद्याने कळंबा कारागृह अधीक्षकावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात कारागृह अधीक्षकांच्या हाताला इजा झालीय.
 
रत्नागिरीहून कळंबा कारागृहात आणलेल्या कैद्याने मंगळवारी सकाळी कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांच्यावर हल्ला केला. सकाळी ते बरंक तपासणीसाठी गेले असता ही घटना घडली. त्यांच्या हाताला दुखापत झाली असून कळंबा कारागृहातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
अधीक्षक इंदूरकर हे मंगळवारी सकाळी कारागृहाची तपासणी करत होते. यावेळी संबधित बंदीने पत्र्याच्या तुकड्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी प्रसंगावधान राखून त्याला वेळीच रोखला. कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच बाजूला केले. मात्र या हल्ल्यात इंदूरकर यांच्या हाताला दुखापत झाली. यासंबधी संशयित बंदीवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे इंदूरकर यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

८८ अयातुल्ला खमेनी अजूनही जिवंत आहेत, ही लढाई दीर्घकाळ चालेल

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

परराष्ट्र धोरणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

राज्यसभा निवडणुकीवर आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान: 'महाविकास आघाडीत कोणताही गतिरोध नाही म्हणाले

मुंबई आणि पुण्यातील भाविकांना महाकालेश्वर आणि उत्तर भारतातील दर्शनासाठी रेल्वे भारत गौरव ट्रेन चालवणार

पुढील लेख
Show comments