Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रायथलॉन वर्ल्डकप 2023‎ स्पर्धेमध्ये येवल्याच्या कृष्णा तनपुरेची चमकदार कामगिरी

Webdunia
सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (21:23 IST)
अबुधाबी दुबई येथे नुकत्याच‎ झालेल्या ट्रायथलॉन वर्ल्डकप 2023‎ स्पर्धेमध्ये येवला तालुक्यातील कृष्णा बाबासाहेब तनपुरे या खेळाडूने चमकदार कामगिरी‎ करून कास्यपदक मिळविले. तर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले. या दोन्हीही स्पर्धांमध्ये पदक मिळविणारा तो‎ भारताचा एकमेव खेळाडू ठरला आहे. आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील कार्यालयात त्याचा यथोचित सन्मान केला. यावेळी कृष्णा तनपुरे यास भावी वाटचालीस शुभेच्छा देत शासकीय मदत व नोकरीसाठी प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
 
येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील रहिवासी कृष्णा बाबासाहेब तनपुरे या खेळाडूने पॅरा ट्रायथलॉन स्पर्धेत देशासाठी पाचवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले तर दोन वेळा नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये यश मिळवीत देशाचे प्रतिनिधित्व केले. नुकत्यात अबुधाबी दुबई येथे ‎झालेल्या ट्रायथलॉन वर्ल्डकप २०२३‎ स्पर्धेमध्ये त्याने चमकदार कामगिरी‎ करून कास्यपदक तर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. या दोन्हीही स्पर्धांमध्ये पदक मिळविणारा तो‎ भारताचा एकमेव खेळाडू ठरला आहे. तसेच चैन्नई येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक मिळविले आहे.
 
तुर्कस्तान येथे सन २०२२ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सहभाग नोंदविला. तर उजबेकिस्तान येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच डिसेंबर २०२३ मध्ये युरोप येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये तो सहभागी होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बुधवारी लोकसभेत NEET विषयावर चर्चा करण्याची मागणी

केनियामध्ये करप्रणाली विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण,39 लोकांचा मृत्यू

IND vs ZIM: टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना, अभिषेक-जुरेल आणि रितू नव्या स्टाईलमध्ये

Hockey: हॉकी इंडिया प्रथमच 40 वर्षांवरील पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी या स्पर्धेचे आयोजन करणार

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

पुढील लेख
Show comments