Festival Posters

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था उध्वस्त करत आहे - अंबादास दानवे

Ambadas Danve
Webdunia
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 (17:39 IST)
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येत आहे. लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरु केली आहे.या योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था उध्वस्त होत असल्याचे शिवसेना युबीटीचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहे.  
ALSO READ: राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी अजित पवार यांनी एक कोअर ग्रुप स्थापन केला
लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारची तिजोरी रिकामी झाली असून राज्य सरकारला इतर योजना राबविण्यात अडचण येत आहे. म्हणून लाभार्थींची संख्या कमी करण्यासाठी सरकार लाभार्थींच्या पात्रतेची पुनर्तपासणी करत आहे. 
ALSO READ: हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्राच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार लोकांच्या हितांसाठी सुरु केलेल्या विविध योजना थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शिवसेना यूबीटीचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते म्हणाले की राज्यावर 8 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.  
ALSO READ: मुंबई शहरातील गरिबांसाठी 'प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची भेट, स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार
महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली नाही. असे दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. सरकार आता योजना बंद करण्याचा आणि लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना महापालिका निवडणुकीनंतर बंद होणार असा दावा केला जात आहे. 
निवडणुकीपूर्व महायुती सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना जाहीर केली. त्यावेळी आम्ही इशारा दिला होता की या योजना राज्यातील अर्थव्यवस्था उध्वस्त करतील आणि आज तसेच घडत असल्याचे दानवे म्हणाले. 
 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Solar Eclipse 2025: सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध आणि तर्पण करता येते की नाही?

Shardiya Navratri 2025 वजन कमी करण्यासाठी साबुदाण्याचे ५ आश्चर्यकारक आरोग्य फायदे

श्राद्ध पक्षात बाळाचा जन्म शुभ की अशुभ?

नवरात्रीमध्ये या वॉटरप्रूफ मेकअप टिप्स फॉलो करा

मेंदू खाणारा अमीबा काय आहे? या संसर्गाची लक्षणे काय आहे जाणून घ्या...

सर्व पहा

नवीन

पुण्यात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव; सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ३२ पुष्टी

LIVE: पुणे शहरात डेंग्यूचे रुग्ण पुन्हा वाढत आहे

अमूलने बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती कमी केल्या

फडणवीसांनी पडळकरांना फटकारलं

उत्तर महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा कहर, १६ तालुक्यांना भयंकर नुकसान

पुढील लेख
Show comments