Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लाखोंचा अवैध दारू साठा गाडीतून केला जप्त

Webdunia
सोमवार, 11 डिसेंबर 2023 (22:48 IST)
Ratnagiri News :सोमवारी सकाळी पहाटेच्या सुमारास मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाठलाग करत हुंडाई क्रेटा या पळ काढणाऱ्या संशयित कारचा मधून विदेशी दारू वाहतुकीसह संशयित आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेत 16 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.  

31 डिसेंबर आता काहीच दिवसांवर येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून भरारी पथक गस्त घालत आहे. या विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोवा राज्य बनावट विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावर या पथकाने रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर एसटी स्थानक समोर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची कसून तपासणी करण्यास सुरु केले असता सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास गोव्याच्या दिशेने येणाऱ्या कारला थांबण्याचा इशारा दिला असता या कारच्या चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने रिव्हर्स गिअर टाकत पळ काढला.

या पथकाने त्या कारचा पाठलाग करण्यास सुरु केले आणि कारला पकडण्यात यश आले. कारचालकाला विदेशी दारूच्या मोठ्या साठासह ताब्यात घेतले आहे. या वाहनामध्ये पथकाला गोवा बनावटी विदेशी दारूचे तब्बल 4 लाखाहून अधिक किमतीच्या 81 पेट्या सापडल्या. या प्रकरणी कार चालकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.  
 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

उज्जैन महाकाल मंदिराच्या गेटची भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, पाच जखमी

बीड जिल्ह्यात 300 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला मथुरेतून अटक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबईत घटस्फोट मागणाऱ्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीने एसिड ओतले

दुसरीच्या मुलाचा बळी !, शाळेच्या प्रगतीसाठी घाणेरडे कृत्य

पुढील लेख
Show comments