Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Last day to pay crop insurance पीक विमा भरण्यासाठी शेवटचा दिवस

pm-kisan-samman-nidhi
, बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (13:50 IST)
Last day to pay crop insuranceप्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी येत्या 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्यसरकारने केंद्रसरकारकडे मुदतवाढ देण्यासंदर्भात विनंती केली होती. आतापर्यंत राज्यात 1 कोटी 50 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. 
 
कर्जदार, बिगर कर्जदार, कुळाने अथवा भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपया नाममात्र दरात पीक विमा काढता येतो. पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती ती आता 3 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एटीएममध्ये पेट्रोल टाकून आग लावणारी व्यक्ती सापडली, अटक नाही