rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Student commits suicide डोकेदुखीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

suicide
Crime News: डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे एका तरुणीने घरातील सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी दुपारसच्या सुमारास घडली. 
 
प्रिया रमेश बुजडे या तरुणीचे नाव असून ती  शहरातील  एका विद्यालयात फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती. प्राप्त माहितीनुसार, गेल्या 20 दिवसांपासून प्रियाचे डोके दुखत होते. तिच्यावर रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले.
 
मात्र, डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे प्रियाने घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. दरम्यान, आत्महत्येपूर्वी प्रियाने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली. आई-बाबा मला माफ करा मी चुकीचे करतेय, डोकेदुखी असह्य झाल्याने मी आत्महत्या करत आहे. असं प्रियाने चिठ्ठीत नमुद केलं.
 
दरम्यान, प्रियाच्या कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना (Police) दिली.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Face like Lord Shri Ganesh भगवान श्री गणेशासारखा चेहरा असलेल्या मुलाचा जन्म