rashifal-2026

आरोग्य विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनेस प्रारंभ

Webdunia
गुरूवार, 14 एप्रिल 2022 (09:28 IST)
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील प्रथम, व्दितीय व तृतीय शैक्षणिक वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांकरीता ग्रीष्मकालीन आंतरवासियता - 2022 योजनेस नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रीष्मकालीन आंतरवासिता योजनेसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत दि. 19 एप्रिल 2022 पर्यत आहे. 
 
विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आंतरवासियता पूर्ण करता यावे यासाठी विद्यापीठाने मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांच्या संकल्पनेतून ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेस ( Summer Internship Program) प्रारंभ केला आहे. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबर संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि इतर विद्वत्तापूर्ण तपासांमध्ये सैद्धांतिकज्ञान आणि विद्यार्थ्यांचे व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रतिष्ठित संस्थेमध्ये वास्तविक जीवनाचा अनुभव व व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यास विद्यार्थ्यांना मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून सदर योजना विद्यापीठाने सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विद्यापीठातर्फे सुरु करण्यात आलेल्या ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेत विद्यार्थ्यांना संशोधन, क्लिनिकल रिसर्च, निसर्गोपचार, योगा, आयुर्वेद, पंचकर्म, वैद्यकीय बायोमेट्रीक, वैद्यकीय तंत्रज्ञान, सामाजिक बांधिलकी, नीतिशास्त्र, पर्यावरणीय आरोग्य विज्ञान, मेडिकल मॅनेजमेंट, इपिडेमोलॉजी, बायोस्टॅटिटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोइंफोरमेटिक्स, रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईक यांच्याशी संयमाने संवाद करण्याची पध्दती, समाजिक आरोग्य व शिक्षण,  धोरण आणि व्यवस्थापन, वैद्यकीय शिस्त, मानसोपचाराचे पैलू आणि सामाजिक उपयुक्तता, मानसोपचार, पोषण आणि आहारशास्त्र, बायोमेडिकल इंजिनिअरींग, वैद्यकीय तंत्रज्ञान पारंपारिक आरोग्य सेवा प्रणाली, वृद्धत्व रोखण्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी सर्वांगीण दृष्टीकोन, इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय रेकॉर्ड, ग्रामीण भागातील लोकसंख्या व आरोग्य समस्या, समाजात रक्तदानाविषयी जनजागृती, रक्तपेढी, आरोग्य क्षेत्रात नॅनो टेक्नोलॉजीचा वापर, अनुवांशिक रोगांबाबत समुपदेशन आदींची माहिती व शिक्षण यामाध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
 
विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षापर्यंतचे विद्यार्थ्यांना ग्रीष्मकालीन आंतरवासियता प्रवेशासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. योजनेत निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रति आठवडा        रु. दोन हजार पाचशे इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी सुमारे दोन ते चार आठवडे इतका असणार आहे. विद्यापीठाने निर्देशित केलेल्या समर इंटरंशिप प्रोग्रम संेंटरवर ग्रीष्मकालीन आंतरवासियता पूर्ण करणाÚया विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
   
ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनाचा कालावधी, शुल्क व अधिक माहिती विद्यापीठाचे  www.muhs.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने अधिसूचनेत दिलेल्या अटी व शर्तीस अधिन राहून दि. 19 एप्रिल 2022 पर्यंत विद्यापीठाकडे अर्ज सादर करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुल विभागास ऑनलाईन ieh@muhs.ac.in या इ-मेल पत्यावर किंवा  दूरध्वनी   क्र. 0553 - 2539156 या क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील अधिष्ठाता, प्राचार्य व महाविद्यालय प्रमुखांनी विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनाची माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागात प्रसिध्द करावी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी असे विद्यापीठाकडून आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

Cyclone Ditva दक्षिण भारतात पाऊस आणि वादळाचा तडाखा, शाळा आणि महाविद्यालये बंद तर विमानसेवा रद्द

शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल; भाजप समर्थकाच्या घरात जबरदस्तीने घुसल्याचा आरोप

ठाणे : महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

झुंझुनूमध्ये अनेक मेंढ्यांचे मृतदेह विखुरलेले आढळले

पुढील लेख
Show comments