Marathi Biodata Maker

चला कास पठाराला जाऊया, हंगामाची सुरूवात 10 सप्टेंबरपासून होणार

Webdunia
मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (21:05 IST)
जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठारावरील हंगामाची सुरूवात 10 सप्टेंबरपासून होणार आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना यावर्षी खुले करण्यात येणार आहे. येत्या 9 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंग सुरू होणार असल्याचा निर्णय वनसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
 
कास पठाराची आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहाणी केली. येणाऱ्या काही दिवसात हे पठार फुलांनी बहरू लागणार असल्यामुळे हा दौरा करण्यात आला. दौऱ्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बन्सल, पर्यटन मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक गौतम पठारे, उपप्रादेशीक परिवहन विभागाचे वरिष्ठ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
 
असे आहे नियोजन
शनिवार 10 तारखेपासून कासचा हंगाम सुरू होणार
9 तारखेपासून ऑनलाईन बुकिंग सेवा सुरु होणार
पर्यटकांना कास परिसरात वाहने घेऊन जाता येणार नाहीत
पुण्याच्या पीएमपीएल विभागामार्फत पर्यटकांसाठी इलेक्ट्रीक बस उपलब्ध होणार
परिसरातील ग्रामस्थांची या इलेक्ट्रिक बसमध्ये गाईड म्हणून नियुक्ती करणार
 कास पठाराला संरक्षणाच्या नावाखाली जाळ्या उभारल्या आहेत त्या तात्काळ काढा  
एमटीडीसी मार्फत शौचालये उभी केली जाणार 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील २२ नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला

३५ आमदार शिंदेंच्या पक्षातून बाहेर पडतील, संजय राऊत यांचा मोठा दावा

Maharashtra Local Body Elections 2025 महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत

महाराष्ट्रात आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान

LIVE: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान सुरू

पुढील लेख
Show comments