Festival Posters

गारवा! नाशिकमध्ये पावसाच्या हलक्या सरी!

Webdunia
मंगळवार, 8 मार्च 2022 (07:51 IST)
उकड्यानंतर अचानक ढगाळ हवामान तयार होऊन  नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली.गेल्या काही दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली होती. त्यामुळे उन्हाचे दिवस सुरू झाल्याचे पाहायला मिळत होते. दरम्यान हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्याना येलो अलर्ट घोषित केला होता.
 
हवामान विभागाच्यानुसार पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान  निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता  वर्तविण्यात आली होती. त्यानुसार आज नाशिकमधील गंगापूर रोड, आंनदवल्ली, गिरणारे परिसर, नाशिक शहरातील काही भागात पावसाचा शिडकावा झाला. दरम्यान दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. यावेळी अनेकजण या पावसाचा आनंद घेताना दिसून आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मुंबई: वांद्रे परिसरात रेल्वेच्या जमिनीवर बांधलेली बेकायदेशीर मशीद पाडताना बुलडोझर कारवाईदरम्यान गोंधळ; अनेक पोलीस जखमी

LIVE: ऑनलाइन औषध विक्रीच्या निषेधार्थ देशभरातील आणि महाराष्ट्रातील केमिस्ट मोठ्या संपावर

पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची दिवसाढवळ्या हत्या

पुण्यातील रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल! ओबीसी नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस

पुढील लेख
Show comments