Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंदूमिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आज पायाभरणी

Webdunia
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (10:09 IST)
मुंबईतील दादरच्या इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आज अर्थात १८ सप्टेंबर रोजी पायाभरणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार आहे. दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आंबेडकर स्मारकातील आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्री उपस्थित राहणार असून यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यात येणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा हा राज्यातील पहिलाच सर्वात मोठा सोहळा असणार आहे. शिवाय लॉकडाऊन काळातीलही हा सर्वात मोठा कार्यक्रम असणार आहे.
 
असे असणार स्मारक
हे स्मारक ४५० फुटांचे, तर बाबासाहेबांचा पुतळा ३५० फुटांचा असणार आहे. यापूर्वी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. नव्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा १०० फूट आणि पुतळा ३५० फूट अशी स्मारकाची एकूण उंची आता जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार आहे. त्यामुळे पूर्वी ७०० कोटी रुपये होणारा खर्च आता १००० कोटी रुपयांवर जाणार आहे. आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता. आता सुधारित खर्च एक हजार ८९ कोटी ९५ लाख अपेक्षित असून, त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. स्मारकाचे काम शापूरजी पालनजी कंपनीमार्फत होणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments